top of page

कष्टार्तव

Updated: Aug 8, 2019

A) व्याख्या-

1)कष्टेन प्रवर्तनम्।

2)कष्टपूर्वक किंवा वेदनासहित रज स्त्राव.

3)मासिक स्त्राव काळात किंवा स्त्राव सुरु होण्यापूर्वी तीव्र कटिशूल, श्रोणीशुल, उदरशूल होणे यास कष्टार्तव असे म्हणतात.



B)पर्याय-

1)कष्टार्तव.

2)रजः कृछ्रता.

3)रजः कष्ट.



C)निदान-


Kashtartav Nidan

वात विकृति कारणमुळे उत्पन्न होतो.

1)मार्गावरोध जन्य.

-मार्गात अडथळा येणे.

-हा क्रियात्मक किंवा रचनात्मक असू शकतो

-उदा. क्रियात्मक- कफादी दोष आवरण यामुळे

रचनात्मक- योनिमुख संकुचित होणे.

-मासिक स्त्रावामध्ये अपानवायु मुख्य असतो.

-अपान वायु कार्यामध्ये काही कारणामुळे अडथळा आल्यास शूल उद्भवतो.



2)धातुक्षयजन्य वातप्रकोप-

-धातुक्षयामुळे हिनसत्व यामुळे कष्ट सहन करण्याची क्षमता कमी व थोडीही कष्ट खुप वाटतात.

-धातुक्षयामुळे वातप्रकोप व वेदना.

-क्षयात्मक संप्राप्तीमुळे जीर्ण व्याधीचा उपद्रव. उदा. पांडु, राजयक्ष्मा.



3)वात प्रकोपक आहार विहार.



D)कष्टार्तव स्वरुप-

1)वर्तिवत वेदना-

-अवयव पिळल्याप्रमाने वेदना. उदा. अंतर्मुखी योनिव्यापद

2)तोदवत वेदना-

-तुद्यत इव वेदना।

-टोचल्याप्रमाने, तोडल्याप्रमाणे वेदना. उदा. सुचीमुखी योनिव्यापद.

3)भेदवत वेदना-

-भिद्यमानत्व इव पीडा।

-भेदन केल्याप्रमाने वेदना.

-वरील वेदना कटी, पृष्ठ, उदर, उरु आणि योनि येथे दिसतात.



E)कष्टार्तव व्यवच्छेद-

1)योनिव्यापद-

-वातज योनिव्यापद

-सन्निपातिक योनिव्यापद.

-उदवार्ता योनिव्यापद.

-अंतर्मुखी योनिव्यापद.

-शुष्का योनिव्यापद.

-परिप्लुता योनिव्यापद.

-विप्लुता योनिव्यापद.

-सुचीमुखी योनिव्यापद.

2)स्त्रीरोग-

-वातज राजोदुष्टि.

-रजः क्षीणता.

-वातज रक्तप्रदर.

3)सार्वदेहीक व्याधी-

-पांडु.

-राजयक्ष्मा.

-शोष.

-मेदोवृद्धि.



F)चिकित्सा-

1)आहार-

-लघु, सूपाच्च पौष्टिक आहार.

2)विहार-

-लघु व्यायाम.

-कटी स्नान.

-उत्तम स्वेद.

3)औषधी चिकित्सा-

-गर्भाशय उत्तेजक

-बल्य

-शोणितस्थापन

-अनुलोमान

4)औषधी योग-

-प्रदरादीलोह

-योगराज गुग्गूळ

-मंजिष्ठादी क्वाथ

-दशमुलारिष्ट

5)शल्यकर्म-

-गर्भाशय ग्रीवा विस्मारण

-गर्भाशय स्थापन.

6)धातुवृद्धिकर-

-सिद्ध क्षीरपाक.

7)मार्गावरोध नाशक-

-लेखन बस्ती.




Kashtartav



Click on dysmenorrhea to read more about modern aspect.


To dowload pdf CLICK HERE.


To download mindmap image CLICK HERE.

Comentários


bottom of page