अतिसार
- Vishal Tarole
- Aug 3, 2019
- 3 min read
Updated: Aug 11, 2019
A)व्याख्या
1) गुदेन बहुद्रवसरणम् अतिसारम् ।। मा. नि.
2) गुद मार्गाने द्रवाचे अतिप्रमाणात निस्सारण.
3) अभ्यंतर मार्गातील रोग.
4) आशुकारी प्रकारचा रोग.
5) अग्निमांद्यजनित प्रधान व्याधि.
B) प्रकार

-आमज अतिसार एक अवस्था नसून एक स्वतंत्र प्रकार आहे.
C) हेतु-
विरुद्धाध्यशनाजीर्णेर्विषमैश्चापि भोजनै: ।
स्नेहादैरतियुक्तऐश्च मिथ्यायुक्तेर्विषर्भयै: ।
शोकाद्दुष्टाम्बुमद्यातिपानै: सात्म्यर्तपर्यायै: ।
जलाभिरमनैर्वेगविघातो: क्रिमीदोषत: ।
अग्निमांद्य करणाऱ्या व द्रवगुणामुळे शरीरात वृद्धि दूष्टि करणाऱ्या कारणामुळे अतिसार उत्पन्न.
1)आहार-
-अतिस्निग्ध, अतिरुक्ष.
-अतिउष्ण, अतिशीत.
-अतिद्रव, अतिस्थूल.
-विरुद्धाशन.
-अध्यशन.
-अजीर्ण.
-विषमाशन.
2)विहार-
-स्नेहादी उपक्रमांचा अति व मिथ्यायोग (विरेचन, बस्ती).
-ऋतुविपर्यय.
-वेगविधारण.
-पाण्यात फार पोहणे.
3)मानसिक-
-अतिभय.
-अतिशोक.
4)विष-
-दुष्टजल.
-दुष्टमद्य.
-दुषिविष.
5)कृमि.
D) संप्राप्ती-
-संशम्यापंधातुराग्नि प्रवृद्ध शकृन्मिश्रो वायुनाध प्रणुन्न।
सरत्यतीवतिसार तमाहुर्व्याधि घोर षड्विध तं वदन्ति।।

-अपधातु- रस, जल, मूत्र, स्वेद, मेद, पित्त, रक्त.
-संप्राप्ती लगेच पूर्ण होते.
-लक्षणे लगेच व्यक्त.
E) पूर्वरूप
-हॄन्नाभिपायुदरकुक्षितोद-
-हृदय, नाभी, गुद, उदर, कुक्षी येथे टोचल्याप्रमाणे वेदना.
-गात्रावसाद-
-अंगसाद
-अनिलसंनिरोधा-
-वातानुलोमनाची क्रिया मंदावने.
-विटसंग-
-मलवष्टम्भ.
-अध्मानमथाविपाको-
-अध्मान, अविपाक.
-प्रकुपित वायुची लक्षणे.
-अवष्टम्भाचे रूपांतर द्रवमलप्रवृत्तिमध्ये होते.
F)सामान्य लक्षण-
- अनियंत्रित वेग हे प्रात्यत्मिक लक्षण.
- बहुद्रवसरणं-
-वेग अधिक, मात्रा अधिक, वेग नियंत्रित नसणे.
-मूत्र व वायु प्रवृत्तिवेळी मलप्रवृत्ति.
-परिणामस्वरूप रसक्षयाची लक्षणे-
-रसे रौक्ष्य श्रमः शोषो ग्लानि शब्द असहिष्णुता। अ. हृ. सु.
-रसक्षये हृतपीडा कंप शून्यताः तृष्णा च। सु.सु.
G)विशेष लक्षणे-
1)वातज अतिसार-
a)हेतु-
i)आहार
-रुक्षाल्पप्रमिताशिनतीक्ष्णमदिव्यवाय-
-रुक्ष पदार्थ सेवन.
-अल्प व प्रमिताशन.
-तीक्ष्ण पदार्थ सेवन.
-मद्य अतिसेवन.
ii)विहार-
-वातातपव्यायामातिमात्रनिषेविण-
-उन वारा यांचे अतिप्रमानात सेवण.
-अतिव्यायाम.
-वेगांचे उदिरण.
b)संप्राप्ती-
-वायु कुपितोअग्नावुपहते-
-वायु अग्निमांद्य करतो.
-मूत्रस्वेदो पुरीषाशयमुपहृत्य-
-मूत्र व स्वेद यांना पक्वाशयात खेचुन आणतो.
-पुरिषं द्रवीकृत्य-
-द्रव धातु संपर्क यामुळे मलाला द्रवता.
-अतिसाराय प्रकल्पते-
-अतिसार उत्पन्न.
c)लक्षणे-
-आमावस्था-
-द्रव सशुलामामगंधमिषच्छब्दमशब्द-
-सशुल, सशब्द.
-आमगंधि.
-पिक्छील.
-द्रव मलप्रवृत्ति.
-मलनिस्सारणाच्या वेळी शुल.
-विबद्धमूत्रवातमतिसार्यते-
-मूत्र व वायु अवरोध.
-वायुश्चान्त कोष्ठे सशब्दशुलस्तिर्यक चरति विबद्ध-
-कोष्ठामध्ये वायु संचारनामुळे अध्मान, आटोप, शुल इ. लक्षणे.
-निरामावस्था-
-विबद्धमल्पाल्प-
- मलप्रवृत्ति बांधून, कमी प्रमाणात, वारंवार.
-सशब्द सशुलफेनपिच्छापरीकर्तिक-
-आवाज होतो, सशुल फेसयुक्त.
-कट्यउरुत्रिकजानूपृष्ठपार्श्वशुल-
-कटी, उरु, जानु, त्रिक, पृष्ठ व पार्श्वप्रदेशी शूल.
-विनीश्वसन-
-श्वास लागतो.
-हृष्टरोमा-
-अंगावर रोमांच उभे राहतात.
-शुष्कमुख-
-तोंड कोरडे पडते.
2)पित्तज अतिसार
a)हेतु-
-आहार
-पुनरम्ललवणकटुकक्षारोष्णतीक्ष्णतिमात्रनिषेविण-
-आम्ल, लवण, कटु, क्षार, तीक्ष्ण यांचे अतिमात्रेमध्ये सेवन.
-विहार-
-प्रतताग्निसूर्यसंतापोष्णमारुतोपहतगात्रस्य-
-अग्नि, सूर्य यांच्या सतत संपर्क मध्ये असणे.
-मानसिक
-क्रोधेर्ष्याबहुलस्य-
-क्रोध, ईर्ष्या इ. कारणामुळे मनप्रक्षोभ.
b)संप्राप्ती-
-पुरीषाशयविस्तृतमौषण्याद द्रवत्वात सरत्वाच्च भित्वा पुरिष अतिसाराय प्रकल्पते।।
-पित्त द्रव गुणाने अग्निचे उपहनन करते.
-पित्त हे उष्ण द्रव सर असल्याने मलाला भिन्नता येते व अतिसार उत्पन्न होतो.
c)लक्षणे-
-तस्य रुपाणी हरींद्र हारीत नील कृष्ण-
-पीत नील हरीत कृष्णवर्णी मलप्रवृत्ती.
-तृष्णादाहस्वेदमुर्च्छाशुलसंताप-
-तृष्णा, मुर्च्छा, दाह , स्वेद, शुल, ज्वर.
3)रक्तातिसार
-पित्तातिसारामध्ये उत्पन्न होणारी एक अवस्था
a)हेतु-
-पित्तलान्यन्नपानानी तस्य पित्त महाबलम्।
-पित्तातिसारी रुग्णाने अधिक प्रमाणात पित्तकर आहार विहाराचे सेवन.
b)संप्राप्ती-
-कुर्याद्रक्तातिसार तु रक्तमाशु प्रदूषयेत।
-कुपित पित्त रक्ताची दूष्टि करते व रक्तातिसार.
c)लक्षणे-
-तृष्णा शुल विदाह च गुदपाक च दारूणम।-
-तृष्णा, दाह, गुदपाक.
-गुदावाटे रक्त पडू लागते.
4)कफज अतिसार-
a)हेतु-
-आहार-
-गुरुमधुरशीतस्निग्धोपसेविन-
-गुरु, मधुर,शीत, स्निग्ध पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन.
-विहार-
-संपुरकस्याचिंतयो-
-निष्काळजी असणे.
-दिवास्वप्नंपरस्यालस्य-
-दिवास्वाप, आलस्य.
b)संप्राप्ती-
-अग्निमुपहत्य सौम्यस्वभावात पुरिषमअतिसाराय कल्पते।
-अग्निचा उपघात करून, कोष्ठात असणाऱ्या मलाला द्रवीभूत करून अतिसार उत्पन्न.
c)लक्षणे-
-तस्य रुपाणी स्निग्ध श्वेत पिक्छील तन्तुमदाम गुरु दुर्गंध श्लेष्मोपहित-
-मल हा श्वेत स्निग्ध, पिक्छील, तन्तुमय, आमयुक्त, गुरु, दुर्गन्धी व कफयुक्त.
-बद्धशुलमल्पाल्पभिक्ष्णमतिसार्यते सप्रवाहिकम।
-बद्ध मलप्रवृत्ति, कुंथावे लागते, कमी प्रमाणात मलप्रवृत्ति होते.
-कृतेअपिअकृतसंज्ञता-
-मलप्रवृत्ति झाली तरी समाधान न वाटता पुन्हा जावेसे वाटणे.
-सलोमहर्षो सोत्कलेशो-
-रोमहर्ष, उत्कलेश.
-निद्रालस्यपरीत-
-निद्राधिक्य, आलस्य.
-सदनोअन्नद्वेशी-
-काही खावेसे न वाटणे.
-गुरुदरगुदबस्तीवंक्षणदेश-
-उदर, गुद, बस्ती, वंक्षण या ठिकाणी गौरव.
5)सन्निपातिक अतिसार-
a)हेतु-
-त्रिदोष प्रकोपक हेतु.
-आहार-
-अतिशीतस्निग्धरुक्षोष्णगुरुखरकठीण-
-शीत, स्निग्ध, रुक्ष, गुरु, खर, कठीण पदार्थांचे अतिसेवन.
-विषमविरुद्धासात्म्यभोजनाद् कालातीतभोजनाद-
-विषमाशन, विरुद्धाशन, असात्म्यभोजन, प्रमिताशन.
-प्रदुष्टमद्यपानीयपानाद-
-दुष्टजल, दुष्टमद्य सेवन.
-विहार-
-ज्वालनादित्यपवनसलिलातिसेवनाद-
-उन, वारा, उष्मा यांचे अतिप्रमाणात सेवन.
-अस्वप्नातिस्वप्नाद-
-अतिजागरण, अतिनिद्रा.
-वेगविधारणाद
-मानसिक-
-भयशोकचित्तोद्वेगातियोगात-
-भय, क्रोध, शोक, उद्वेग यांनी मनक्षोभ.
-कृमिशोष ज्वरार्शोविकारातिकर्षणाद-
-कृमि, शोष, ज्वर, अर्श यामुळे शरीर क्षीण होणे.
b)लक्षणे-
-त्रिदोष प्रकोपामुळे अनेक लक्षणे दिसतात.
-हारिद्रहारीतनीलमंजिष्ठामांसधावनासन्निकाश
-मल हरिद्राप्रमाणे पीत, हरीत, नील, मंजिष्ठाक्वाथाप्रमाणे तांबूस, मांस धुतलेल्या पान्यासारखी.
-रक्त कृष्ण श्वेत वराहमेद
-रक्तवर्णी, कृष्णवर्णी, डुकराच्या चरबीसारखी दिसणारी.
-सदृशमनुबध्दवेदनम्वेदन-
-वेदनायुक्त वा वेदनारहित.
-तृष्णादाहज्वर भ्रमतमकहिक्का श्वासानुबंधमतिवेदनमवेदनं-
-त्रिदोषांनी धातुदुष्टि झाल्यास तृष्णा दाह ज्वर भ्रम, तम प्रवेश, हिक्का, श्वास हि लक्षणे आढळतात.
-मल प्रवृत्ति वेळी क्वचित शुल असतो कधी नसतो.
6)आमातिसार-
a)संप्राप्ती-

b)लक्षणे-
-मल-
-साम.
-पिक्छील, चिकट, दूरगंधित.
-मल पाण्यात बुडतो.
7)शोकतिसार-
a)संप्राप्ती-

H) साम निराम भेद-

I)अतिसार बरा झाल्याची लक्षणे-
-यस्योच्चार विना मूत्र सम्यग्वायुश्च गच्छति-
-मूत्र व अधोवायु प्रवृत्ति मलप्रवृत्तिखेरीज होते.
-दीप्ताग्नेर्लघुकोष्ठस्य-
-अग्निप्रदीप्त.
-कोष्ठलाघव.
J)उपद्रव-
-अतिदारुण उपद्रव.
-शोथ शुल ज्वर तृष्णा श्वास कासमरोचकम।
छर्दि मुर्च्छा च हिक्का च.....।
-निद्रानाशोअरति कम्पो मूत्रघातो विसंज्ञता।
-रसक्षयाची लक्षणे.
-अर्शोतिसारग्रहणीविकाराः प्रायेण चान्योन्यनिदानभुता।।
-ग्रहणी व अतिसार हे व्याधी उपद्रव म्हणून उत्पन्न
K)साध्यासाध्यत्व-
-रसक्षयावरुन ठरते.
-साध्य-
-सौम्य लक्षणे.
-मुर्च्छा, छर्दि, मूत्राघात नसणे.
-असाध्य-
-दन्त, ओष्ठ, नख याठिकाणी श्यावता.
-मोह, छर्दि.
-डोळे खोल जाणे.
-मलाचा विचित्र वर्ण.
-बल मांस क्षीण, ज्वर, श्वास, शोथ.
-मूत्राघात व मलप्रवृत्ती उष्ण.

To download atisar pdf CLICK HERE.
To dowload atisar mind map CLICK HERE.
Comments