top of page

स्थौल्य


1. परिभाषा

स्थौल्यस्या भावा स्थूलता लक्षण|

च. सु. 16

-स्थूलतेचा भाव म्हणजे स्थौल्य

-चिरकारी व्याधी

-याप्य व्याधी

-अत्यंत पीडाकर व्याधी

-अष्टविध निंदनीय व्याधींमध्ये समावेश

2. व्याख्या

-मेदोमांसअतिवृद्धत्वात चलस्फिकगुदस्तन:|

आयथोपचय अउत्साहो नारो अतीस्थूल उच्च्यते||

च. सु. 21/9

- मेदासह मांसधातूची अस्वाभाविक वाढ

-नितंब, उर, स्तन यांची अतिरिक्त वृद्धी

-कोणतेही कार्य करण्याचा उत्साह नसणे

-दारूण विकार उत्पन्न होताना दिसतात

3. मेद वृद्धी

- तथा मेदस्तथा श्रमन श्रमारुप चेष्ठीते श्वास स्फिकस्तनोदरलंबनम|

-अ.ह्रु.सु.

4. मेदोदरविकार

-ग्रंथीवृद्धि गलगंडार्बुद मेदोजोष्टप्रकोपा:|

मधुमेहअतिस्थौल्यअतिस्वेद प्रभूतयो मेददोषजविकार||

- सु. सु. 24

5. प्रमुख संदर्भ ग्रंथ

- चरक संहिता सुत्रस्थान- अध्याय 21

- सुश्रुत संहिता सुत्रस्थान- अध्याय 15

- अष्टांग संग्रह सुत्रस्थान- अध्याय 24

6. हेतू

-तत अतीस्थूल अतीसंपूर्णत गुरु मधुर स्निग्धपयोगात|

अव्यायामात अव्यवायात दिवास्वप्नात हर्षनित्यत्वत|

अचिंतत्वात बीजस्वभावात उपजायंते||

-च. सु. 21/4

- आहारज

- अति मात्रेमध्ये खाणे. भूक नसताना खाणे

-अति मात्रेमध्ये गुरु, मधुर, स्निग्ध आहाराचे सेवन

- विहारज

- व्यायाम व मैथुन न करणे

- चिंता न करणे

- बीजदोष

7. संप्राप्ती

-हेतुसेवनामुळे मेदव्रुद्धी

-मेदव्रुद्धीमुळे स्त्रोतोरोध व वायु विमार्गगत

-वायु विमार्गगत झाल्यामुळे कोष्ठामध्ये संचार व जाठराग्नी संधुक्षण

-प्रदीप्त जाठराग्निमुळे आहाराचे पचन व शोषण व अधिक क्षुधा

(धात्वाग्नि संधुक्षण न होता जाठराग्नि संधुक्षण होत राहते)

8. संप्राप्ती घटक

- दोष- त्रिदोष

- दुष्य- मेद

- अधिष्ठान- सर्व शरीर, विशेष स्थान स्फिक, नितंब, उदर

- स्त्रोतस- मेदोवह स्त्रोतस

- व्याधी स्वभाव- दारुण

9. पूर्वरूप

- मेदसंचय होण्यास सुरुवात

- मेदसंचिती सुरुवात प्रथम उदरभागी

- आलस्य

- स्वेदप्रव्रुत्ती

- श्रमाने श्र्वास

10. लक्षणे

-अतिस्थुल तावत आयुष्योर्हासो जवोपरोधः क्रुच्छ्रव्यवायता दौर्बल्य दौर्गंध्यं स्वेदाबाधः क्षुदतिमात्रं पिपासातियोगश्चेति भवन्ति अष्टदोषाः।।

-च.सु. 21/4

1. आयुष्य कमी होणे

2. जवोपरोधः

3. क्रुच्छ्रव्यवायता

4. दौर्बल्य

5. दौर्गंध्यं

6. स्वेदाबाध

7. अतिक्षुधा

8. अतित्रुष्णा

11. साध्यासाध्यत्व

- वाग्भटांनी असाध्यता स्पष्ट केली आहे

- मेदधातुचे लेखन करावे परंतु वातप्रकोप होउ नये या विरुद्धोपक्रमामुळे असाध्य

12. चिकित्सा

- निदान परिवर्जन

- आहार

-वातघ्न, कफघ्न, मेदोघ्ण आहाराचे सेवन करावे

-गुरु पण अपतर्पण आहाराचे सेवन

-तक्र सेवन

-आहार रुक्ष, उष्ण, तीक्ष्ण असावा

-मधुदक उपयोग

-उपवास

-कोष्ण जलपान

- विहारज

-जागरण करावे

-चिंतन करावे

-रुक्ष उद्वर्तन

-व्यायाम करावा

-पंचकर्म

-रुक्ष, उष्ण, तीक्ष्ण, लेखन द्रव्यांचा बस्ती

-वुषकदी गन मधील द्रव्यांचा उपयोग करावा

- रुक्ष द्रव्यांचे उद्वर्तन

-औषधे

-त्रिफळा गुग्गुळ

-चंद्रप्रभा वटी

-स्वेदोहर लेप

-आरोग्यवर्धिनी

- नैसर्गिक चिकित्सा

-मृत्तिकालेप

-आतप सेवन

-व्यायाम

-योगासने

To download pdf file CLICK HERE

To download ppt file CLICK HERE

To watch video on YouTube CLICK HERE







Comments


bottom of page